नागपूर: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर विशेष शुल्कावर दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ ऑक्टोबर (शनिवार) आणि ८ ऑक्टोबरला (रविवार) रात्री १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबेल. या गाडीला १८ डबे असतील. यामध्ये – एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, सात शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणींचे सामानसह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.