चंद्रशेखर बोबडे

नागपूर : पूर्व विदर्भात बेरोजगारीचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे, याची कल्पना सरकारी रोजगार मेळाव्यातून तरुणांना मिळालेल्या नोकरीच्या संधीवरून येते. जानेवारी ते मे २०२३ या काळात नोकरीसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या नागपूर विभागातील ८ लाख ५१ हजार ३०१ पैकी केवळ १ हजार १६५ उमेदवार नोकरी मिळाली. नोंदणीच्या तुलनेत हे प्रमाण एक टक्क्यांहून कमी आहे.

हेही वाचा… अमरावती : उद्धव ठाकरेंनी २५ वर्षे मुंबईला लुटले, प्रवीण दरेकर यांची टीका

हेही वाचा… नागपूर: नवरी निघाली चार महिन्यांची गर्भवती; नवरदेवाने डोक्यावर हात मारून घेतला अन् …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग विविध कंपन्या, उद्योजक आणि बेरोजगार यांची सांगड घालण्याचे काम करतो. बेरोजगार तरुणांची विभागाकडे नोंदणी केली जाते, त्याचप्रमाणे खासगी व सार्वजनिक उद्योगही त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची नोंद या विभागाकडे करते. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कंपन्या, उद्योजक त्यांना आवश्यक मनुष्यबळाची निवड करते. विभागाकडे जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर नागपूर विभागातून ८ लाख ५१ हजार ३०१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून यापैकी १ हजार १६५ उमेदवार नोकरीस लागले. नागपूर विभागात मोठे उद्योजक आणि कंपन्या नसल्याने रोजगाराच्या संधी राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत कमी उपलब्ध आहेत. वरील प्रकारच्या मेळाव्यातून मुंबईत मुंबई विभागातून २३ हजार ६३४, पुणे विभागातून २८ हजार २८० व नाशिक विभागातून १४ हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली हे येथे उल्लेखनीय.