वर्धा: रात्रीपासून पावसाची सततधार शेतकऱ्यांची दैना करणारी ठरत आहे. पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसाचे आगार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. पण पावसाने ही ओळख मिटविण्याचा चंगच बांधल्याचे चित्र आहे.
पांढरे झालेले शेतशिवार ओलेचिंब झाले. कापसाचा वेचा मजुराअभावी शेतातच पडून होता. तो भिजला. वेचन व्हायची असलेल्या शेतातील कापूस आडवा झाला.
हेही वाचा… अमरावती: सराफा व्यावसायिकाची घरात शिरून हत्या, दागिनेही लंपास
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तुरीच्या पिकास चांगला बहार आलेला असतांनाच या वातावरणामुळे अळ्या पडण्याची भीती वाढली आहे. गळून पडणारा कापूस व तुरीच्या शेंगा आर्थिक गणित बिघडविनार. या खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान आधीच होवून गेले.आता हा दोन दिवसापासून झडणारा पाऊस तोंडचे पाणी पळविेत आहे.