यवतमाळ : राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम असून भाजपच्या मर्जीवरच राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. ते आज शुक्रवारी शहरात पक्षसंघटन बांधणीसाठी आले असता विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>>गोंदिया : पश्चिम बंगालचे हत्ती नियंत्रण पथक नागणडोह येथे दाखल, हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. आंबेडकर म्हणाले, युतीच्या राजकारणात सर्वच पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष गरजेचे आहेत. निवडणूक स्वतंत्रपणे लढली तरच पक्ष यापुढे टिकतील. बहुजन आघाडीही स्वतंत्र लढेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने राजकारणातून वेळ काढून शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यात संघटन बांधणी पूर्ण झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत अद्याप कुठलीही भूमिका घेतली नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत बोलण्याचे ॲड. आंबेडकर यांनी यावेळी टाळले. मात्र, ते विद्वान आहेत, अशी टिप्पणी केली. पत्रकार परिषदेस वंचित बहुजन युवा आघाडीचे डॉ. निरज वाघमारे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर आदी उपस्थित होते.