लोकसत्ता टीम

नागपूर: ‘ती’ ताडोबाची राणी, तर ‘तो’ दोघांचे साम्राज्य मोडीत स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा! त्या दोघांनाही कित्येकदा ताडोबात एकत्र फिरतांना पाहिलय. त्यांच्या प्रणयाचे कित्येकजण साक्षीदार ठरलेत. त्यांच्यातील ही ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी कॅमेऱ्यात अलगद टिपली आहे.

‘माया’ ही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची राणी. पांढरपवनी हा तिचा हक्काचा अधिवास. तिची एक झलक बघण्यासाठी आणि तिला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक जीव की प्राण ओवाळतात, तर ‘रुद्रा’ हा वाघही त्यापेक्षा वेगळा नाही. ‘माया’ वर त्याचा विशेष जीव आणि तिच्यासाठी त्याने ‘बलराम’ सह कित्येक वाघांशी लढाही दिला.

व्हिडिओ सौजन्य- अरविंद बंडा

हेही वाचा… देव तारी त्याला कोण मारी! शेतकरी कुटुंबातील ६०० ग्रॅम वजनाच्या बाळाला वाचवण्यात यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळसा परिसरातील शिवनझरीला जन्मलेल्या ‘रुद्रा’ या वाघाने ‘मटकासूर’ व ‘बजरंग’ या वाघाचे साम्राज्य मोडीत काढले. त्यांना बाहेर काढून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आणि हीच बाब ‘माया’ या वाघिणीला त्याच्या प्रेमात पाडण्यास कारणीभूत ठरली. ‘माया’ ही कित्येक बछड्यांची आई, पण तरीही ‘रुद्रा’चे तिच्यावर विशेष प्रेम. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांनी कित्येकदा त्यांच्यातील हा प्रेमाचा ओलावा अनुभवला. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी अनेकदा त्यांचे हे प्रेमाचे क्षण कॅमेऱ्यात टिपले, पण या व्हिडिओतील चित्रण काही वेगळेच होते.