नागपूर : फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या ३२ टक्के होती. आता ती आठ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. तेथील हिंदू सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदूने किमान दोन अपत्ये जन्माला घालावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले.

हेही वाचा : गडचिरोली : अधिकारी, कंत्राटदार मालामाल; लोकप्रतिनिधी हैराण? निकृष्ट रस्त्यांमुळे…

police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
vhp on ayan mishrea murder case
Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 

गोविंद शेंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षात हिंदूंची संख्या ८ टक्क्यांपेक्षा कमी होत असल्यामुळे तेथील हिंदू आज अत्याचाराला बळी पडत आहेत. लिव्ह इन रिलेशनशीप कायम राहिले तर आपल्याकडे हिंदू अल्पसंख्यक होतील. हिंदूची संख्या जास्त असेल तरच लोकतंत्र टिकेल, अन्यथा भारतात सुद्दा बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होईल. प्रत्येक हिंदूने दोन अपत्य जन्माला घातले पाहिजे तरच देश सुरक्षित राहील. सध्या बांगलादेश हिंसा आणि अराजकतेने ग्रासला आहे. तेथील पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकतावादी अधिक प्रबळ झाले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहेत. बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू अल्पसंख्याकांची धार्मिक स्थळे, व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरांचे नुकसान करण्यात आले. हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत आहे. मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे. बांगलादेशात क्वचितच असा कोणताही जिल्हा शिल्लक असेल जो त्यांच्या हिंसाचाराचे लक्ष्य बनला नसेल. वेळोवेळी होणाऱ्या अशा दंगलींचाच हा परिणाम आहे की फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या आता केवळ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे आणि ते सतत अत्याचाराला बळी पडत आहेत. या परिस्थितीत भारत नक्कीच दुर्लक्ष करू शकत नाही. जगभरातील शोषित आणि विस्थापित लोकांना मदत करणे ही आपली परंपरा राहिली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावध राहणे गरजेचे आहे, असेही शेंडे म्हणाले. यावेळी विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.