वर्धा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर राजकीय हालचाली वेगात वाढल्या. स्थानिक पुढाऱ्यांनी कंबर कसली. तर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन दौरे सुरू झालेत. युती ही स्वबळ याचीही चर्चा सूरू झाली आहे. त्यात आता आम आदमी पार्टी म्हणजेच आप पक्षाने आपली भूमिका जाहीर करून टाकली आहे.
वर्धा जिल्हा आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात स्थानिक विश्राम भवन येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अनुषंगाने चर्चा झाली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्य प्रभारी तथा दिल्ली विधानसभेचे माजी आमदार प्रकाश जारवल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष अजित दादा फाटके पाटील यांच्या नेतृत्वात पुणे येथे राज्यस्तरीय आढावा बैठकीत या निवडणुकीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. देण्यात आलेल्या सुचना वजा आदेशाची अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या संभाव्य जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आम आदमी पार्टी स्वबळावर स्वतंत्ररित्या लढणार असुन कोणत्याही प्रकारची युती कोणत्याच पक्ष सोबत करण्यात येणार नसल्याचे राज्य प्रभारी प्रकाश जारवल यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. याच अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष अजितदादा फाटके पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष यांना जिल्ह्यात आढावा बैठकी आयोजित करून इच्छुक उमेदवार चाचपणी आणि निवडणुकीचे जिल्हास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी स्थानिक विश्राम भवन येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करून राज्य समिती कडून देण्यात आलेल्या सूचनांची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. या सोबतच उपस्थित पदाधिकाऱ्यांना आपली मते मांडण्याची संधी देऊन, इच्छुक उमेदवारांनी आपापले प्रभाग क्षेत्र निश्चित करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत जिल्हा कार्यकारिणी मध्ये फेरबदल तसेच शहर व तालुका कार्यकारिणीच्या संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आढावा बैठकीचे सुत्र संचालन मयुर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप डंभारे यांनी केले.
आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष हरीश मोकलकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण पारीसे, जिल्हा कोषाध्यक्ष दत्ताजी भोंबे, जिल्हा संघटन मंत्री सूर्या सोनोने, जिल्हा सह सचिव खालिद खान, जिल्हा सह संघटन मंत्री शुद्धोधन मेंढे, जिल्हा समिती सदस्य नितीन झाडे, शाहरुख पठाण, दिवाकर चव्हाण, मयुर राऊत, संदीप डंभारे, शेखर धोंगडे, संतोष कुंभेकर, निलेश, उपस्थितं होते.