वर्धा : राज्यात ५ डिसेंबरला नवे सरकार अस्तित्वात येणार. या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होवू घातला आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री म्हणून वर्णी लागावी, यासाठी विविध पातळीवर लॉ्बिंग करण्याचे आमदारांचे प्रयत्न सूरू असल्याच्या चर्चा होतात. त्यापूर्वी एक महत्वाची बैठक होणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी चार डिसेंबर रोजी विधान भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये नवनिर्वाचित विधानसभा सदस्य तसेच विधान परिषद सदस्यांची म्हणजेच आमदारांची बैठक सकाळी दहा वाजता बोलावली आहे. तेव्हाच सर्व भाजप आमदार नेता निवड करतील, अशी चर्चा आहे.

जिल्ह्यात सर्व चारही जागा भाजपकडे गेल्या आहेत. म्हणून मंत्रीपद देण्याची विनंती भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांना भेटून केली. तर आमदार मात्र या घडामोडीपासून दूर असल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडून आल्यानंतर चारही आमदार भेटुन आले. त्यानंतर आमदार समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, राजेश बकाने व सुमित वानखेडे यांनी विविध विकास कामांचा आढावा घेणे सूरू केले. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी देवळी गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामची पाहणी केली. हे काम सतत का रखडत चालले आहे याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी अग्निशमन वाहन लोकार्पण सोहळा पार पाडला. नंतर बांधकाम विभागाची बैठक घेत तळेगाव व अन्य रस्त्यांच्या कामाच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दोन दिवस ग्रामीण भागात भेटी दिल्या. केळझर गणेश दर्शन, जनता दरबार व सेलू तालुका भाजप बैठक नियोजित केल्यात. आमदार समीर कुणावार यांनी जनतेशी गाठीभेटी घेणे सूरू ठेवले आहे. मंत्रीपद जिल्ह्यास मिळाले तर आनंदच. ते कोणाला द्यायचे तो निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते घेतील. लॉ्बिंग कशाला, असा सूर या आमदारांचा दिसून आला. हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय मार्गी लावायचे, हे महत्वाचे असल्याचे हे आमदार सांगतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : Nitin Gadkari : “कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दु:खी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून…”, राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

कुणावार व भोयर हे तिसऱ्यांदा आमदार झाले असून बकाने व वानखेडे हे प्रथमच आमदार झाले आहेत. विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यास मग मंत्रीपदावर संक्रांत येणार म्हणजेच विदर्भाच्या वाट्याला कमी मंत्रीपदे येणार, अशी शंका व्यक्त होते. तसेच वरिष्ठ, सामाजिक समतोल, विभाग असे निकष असतातच. त्यामुळे लॉ्बिंग करण्यापेक्षा लोकांच्या कामात लक्ष ठेवलेले बरं, अशी भूमिका दिसून येते.

Story img Loader