लोकसत्ता टीम

वर्धा: सामाजिक संस्थांचे आगार असलेल्या वर्धा जिल्ह्याने आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे संपन्न राज्य कार्यकारिणीच्या संमेलनात वर्धा शाखेचा गौरव करण्यात आला.

३२ जिल्हा सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा अहवाल सादर केला. दुसऱ्या दिवशी कार्यकर्ता सन्मान सोहळा आयोजित झाला. त्यात सर्वोत्कृष्ट शाखा, सर्वोत्कृष्ट जिल्हा, लक्षवेधी व शतकवीर असे चार पुरस्कार वर्धेस मिळाले. जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले, निखिल जवादे, डॉ.हरीश पेटकर, प्रकाश कांबळे, राज्य सचिव गजेंद्र सू यांनी हे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. साळुंके यांच्या हस्ते स्वीकारले.

आणखी वाचा-अपंग व्यक्तीच्या हत्येने अकोला हादरले; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे, संपादक डॉ. नितीन शिंदे व उत्तम जोगदंड यांनी या कामगिरीचे कौतुक केले. विविध ठराव संमत करण्यात आले. प्रा.संजय बनसोडे, डॉ.ठकसेन गोराने, नंदकुमार तळशिलकर यांनी संबोधित केले. संमेलन यशस्वी करण्यात कोल्हापूर अनिसचे पदाधिकारी तसेच कृष्णात स्वाती, सचिन थिटे, रुक्साना मुल्ला, विनायक साळवे, सुधाकर काशीद यांचे योगदान लाभले.