scorecardresearch

Premium

वर्धा : फसवणूक करीत मंडळाचे विश्वस्त झाले; सात जणांविरोधात गुन्हे दाखल

मालदार संस्थेचा पदाधिकारी होण्याच्या मोहापोटी फसवणूक करण्याची बाब अडचणीत आणणारी ठरली.

maheshwari yuvak mandal committee fraud, maheshwari yuvak mandal committee hinganghat
वर्धा : फसवणूक करीत मंडळाचे विश्वस्त झाले; सात जणांविरोधात गुन्हे दाखल (संग्रहित छायाचित्र)

वर्धा : मालदार संस्थेचा पदाधिकारी होण्याच्या मोहापोटी फसवणूक करण्याची बाब अडचणीत आणणारी ठरली. हिंगणघाट येथील माहेश्वरी युवक मंडळ ही प्रतिष्ठित संस्था आहे. संस्थेचा कारभारी होण्यासाठी रामकुमार जुगलकिशोर डागा, विनोद अशोक मेहता, मुरली रामचंद्र लाहोटी, संजय गणेशीराम डालीया, आशिष वल्लभदास राठी, उदय विजसिंग मेहता, प्रेमकुमार राजुकुमार जाजू, सर्व राहणार हिंगणघाट यांनी ८ जानेवारी २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत माहेश्वरी मंडळाचे ट्रस्टी व सहायकाच्या परवानगी शिवाय शेड्युलच्या प्रतीत फेरफार केली.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले, १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Nitish Kuma
“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल
pimpri-chinchwad-PCMC-1_ae7929
पिंपरी : ‘एसटीपी’वर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यास गृहनिर्माण संस्थाधारकांचा विरोध, निर्णय रद्द करा, अन्यथा…
Nirmala Sitharaman asserted that the government has succeeded in delivering social schemes to the intended beneficiaries
सामाजिक योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश – सीतारामन
uddhav thackeray narendra modi rahul gandhi
“राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मुळे भाजपाच्या तंबूत घबराट, म्हणूनच…”, ठाकरे गटाची टीका

तसेच शेड्युल एक मध्ये त्यांनी त्यांची नावे टाकली. अश्याप्रकारे त्यांनी स्वतःला विश्वस्त दाखवून फसवणूक केली. मंडळाच्या मारोती वॉर्डातील काही सदस्यांनी याबाबत तक्रार केली. त्या आधारे हिंगणघाट पोलीसांनी सात जणांविरोधात गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला आहे. या घटनेने समाजात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wardha hinganghat maheshwari yuvak mandal committee fraud case registered against 7 persons pmd 64 css

First published on: 29-11-2023 at 12:11 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×