नागपूर: ऑपरेशन सिंदूरनंतर कारगिल जिल्ह्यातील एका गावातून नागपूरची एक महिला काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. या महिलेला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दहा दिवसानंतर भारताच्या सुपूर्द केले आहे. ही महिला हुंदरमन गावातून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली होती. तेथे त्यांना पाकिस्तानी लष्काराने अटक केली होती.

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर ही महिला भारत-पाक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला कारगिलच्या एका हॉटेलात सोडून पाकिस्तानात पोहोचली होती. हा मुलगा बालकल्याण समितीच्या देखरेखीत आहे.

ही महिला कोण आहे?

या महिलेचे नाव सुनीता जामगडे आहे. ती नागपूर येथील रहिवासी असून ४३ वर्षांची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना नियंत्रण रेषेवरील एका गावातून अचानक बेपत्ता झाली होती. १४ मे रोजी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्या होत्या. सुनीता नागपूरच्या एका रुग्णालयात परिचारिकेचे काम करीत होत्या. तो व्यवसाय सोडून त्यांनी कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्या घरोघरी जावून कापड विक्री करीत होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ती मानसिकरित्या आजारी आहे आणि ती स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहे. ती कारगिल जिल्ह्यातील हुंदरमन या गावातून पाकिस्तानात गेली होती. पोलिसांच्या माहितीनुसार सीमा ओलांडल्यानंतर काही वेळात तिला पाकिस्तानच्या लष्कराने अटक केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार सुनीता अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये धर्मगुरू म्हणून काम करणाऱ्या जुल्फिकार यांच्यासोबत समाजमाध्यमातून संवाद साधत होती. तिचा त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न होता, अशीही चर्चा आहे. तिला नागपुरात आणल्यानंतर त्या गुप्तचर किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी आहे काय, याचा तपास केला जाणार आहे.

सुनीतांच्या भावाने तक्रार नोंदवली

सुनीता जामगडे बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूरमधील कपीलनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सुनीता बेपत्ता झाल्यानंतर तिचा मुलास बाल कल्याण समिति (सीडब्ल्यूसी)च्या देखरेखीखाली एका बालगृहात ठेवण्यात आले आहे. त्याला लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहस्यमरित्या बेपत्ता झाल्यानंतर पाकिस्तानातून परत आल्यानंतर संशय वाढला?

पोलिसांच्या माहितीनुसार सुनीता आपल्या १२ वर्षांच्या मुलासह कारगिलजवळील एका सुनसान गावाकडे निघाली होती. परंतु मुलास हॉटेलास सोडून नियंत्रण रेषा ओलांडली. सुनीता मुलास सोडून पाकिस्तान गेल्याने पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीशी तिचे संबंधांचा तपाससुरू आहे.