नागपूर : नागपूर-शहडोल-नागपूर नवीन रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. गाडी क्रमांक ०८२८७ शहडोल-नागपूर उद्घाटन विशेष २९ ऑगस्टला धावणार होती. ही विशेष गाडी दुपारी दीड वाजता सुटेल आणि नागपूरला ४ वाजता पोहोचेल.

ही गाडी उमरिया, कटनी दक्षिण, जबलपूर, नैनपूर, सिवनी, छिंदवाडा, सौसरमार्गे नागपूरला येईल. त्यानंतर नागपूर-शहडोल एक्स्प्रेस साप्ताहिक गाडीची नियमित सेवा ४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ११२०१ नागपूर-शहडोल एक्स्प्रेस नागपूरहून ११.४५ वाजता सुटेल. नागपूरहून दर सोमवारी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.२९ वाजता शहडोलला पोहोचेल. ११२०२ शहडोल-नागपूर एक्स्प्रेस शहडोल येथून दर मंगळवारी पहाटे ५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल, असे रेल्वेने कळवले होते, पण आता अचानक हा निर्णय फिरवला आहे.

हेही वाचा – मेळघाटच्या प्रतिबंधात्मक गाभा क्षेत्रात ‘वन्यजीव परिवारा’चे पर्यटन, वनविभागाचे नियम तुडवले पायदळी

हेही वाचा – ‘तू माझ्याशी लग्‍न कर, नाहीतर तुझी…’, अमरावती विद्यापीठ परिसरात युवकाची युवतीला शिवीगाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर ते शहडोल दरम्यान नवीन साप्ताहिक ट्रेनचे उद्घाटन आणि शहडोल ते नागपूर दरम्यान विशेष ट्रेनचे उद्घाटन पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, असे जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.