लोकसत्ता टीम

नागपूर : शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडले. आता निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोबत घेत आहे. त्यामुळे भाजपला एकट्या उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे, हे कळून चुकले असल्याचे मत उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केले.

वरुण सरदेसाई नागपुरात आले असता ते बोलत होते. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीसाठी अतिशय उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरेच्या दौऱ्यांनाही जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासोबत कोण आहे यापेक्षा आमची ताकद कशी वाढेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. उद्धव ठाकरे यांची भरपाई करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले. त्यानेही भागले नाही तर राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री कराव लागले. काँग्रेस फोडून अशोक चव्हाण यांना घेतले आणि आता मनसेलाही सोबत घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे महत्त्व त्यांना कळले आहे.

आणखी वाचा- भंडारा गोंदियात कमळ फुलणार की ‘टिकटिक’ वाजणार? तिढा कायम, इच्छुकांची कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे जे आदेश देशील त्याच पालन आम्ही कार्यकर्ते करत असतो. रामटेकमध्ये पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेतले आहे. रामटेक लोकसभा असो किंवा विधानसभा असो शिवसेनेची भरपूर ताकद आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर जागावाटप कसं होते. हे वरिष्ठ नेते सांगू शकते. हा शिवसेनेचा गड असून तो शिवसेनेचा राहणार आहे. केवळ युवकांना संधी मिळाले पाहिजे असे नाही तर जिंकण्याची ताकदही पाहिजे. माझ्यासोबत विरोधात लढताना कोणता उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा प्रभाव करू शकतो हे पाहणे गरजेचे आहे हे पाहूनच वरिष्ठ नेते उमेदवार देतील असेही सरदेसाई म्हणाले.