वर्धा: प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेत स्थापन करण्याची घोषणा राज्य शासन करून चुकले आहे. तर हे महाविद्यालय हिंगणघाट इथेच व्हावे म्हणून हिंगणघाटकर निकराची लढाई लढत आहे.

गत अडीच महिन्यापासून हिंगणघाट येथे तर काही दिवसापासून मुंबईत आंदोलन करीत लक्ष वेधलं जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला. तर या मागणीने पेचात पडलेले आमदार समीर कुणावार म्हणतात की हिंगणघाट येथे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा निश्चित झाल्याने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा… अमरावती विमानतळासाठी केंद्र सरकारचीही ‘उडवाउडवी’! पंधरा वर्षांपासून कामे रखडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र त्यांची ही खात्री शासनानेच फोल ठरविली आहे. कारण वर्धा येथे महाविद्यालयाची घोषणा, त्यासाठी जागा निश्चिती झाल्यावर आता हे स्थळ गृहीत धरून डॉ. एन. वाय. कामडी यांची वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नेमणूक जाहीर केली आहे. तर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव पाटणकर यांनी दिलेत. ही घडामोड हिंगणघाटकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याची बाब ठरणार.