भंडारा : एका तरुणीची हत्या झाल्याची माहिती एका महिलेने ११२ या आपत्कालीन सेवा क्रमांकावर दिली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले. मात्र तपास केले असता हत्येची कोणतीही घटना त्या ठिकाणी घडलेली नव्हती. कुणीतरी पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी माहिती देण्यासाठी फोनचे लोकेशन ट्रेस केले.

११२ सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर करून खोटी माहिती देणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी येथील रहिवासी रीता रामभाऊ देशकर यांनी डायल ११२ वर फोन करून एका मुलीच्या हत्येबद्दल पोलिसांना खोटी माहिती दिली.परिसरात एका तरुणीची हत्या झाली आहे पोलिसांनी ताबडतोब यावे अशी माहिती रिता यांनी फोनवरून दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, डायल साईडवरून ११२ च्या डिस्पॅचरच्या लोकेशननुसार भंडारा पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच वरठी पोलिस ठाण्याचे प्रभारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.तथापि, घटनास्थळी तपास केला असता पोलिसांना कोणताही खून किंवा गुन्हेगारी घटना आढळून आली नाही. यानंतर पोलिसांनी कॉल करणाऱ्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा फोन सतत बंद आढळून आला. २० जुलै रोजी सायबर सेल भंडारा कडून कॉल करणाऱ्याची माहिती मिळाली, ज्यामध्ये रिता रामभाऊ देशकर या महिलेने डायल ११२ वर खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. हे कृत्य गंभीर मानून भंडारा पोलीस अधीक्षकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.

याअंतर्गत भंडारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २१७ अंतर्गत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, डायल ११२ सारखी सेवा आपत्कालीन परिस्थितीत सामान्य जनतेला तात्काळ मदत देण्यासाठी आहे.

त्याचा गैरवापर करणे आणि खोटी माहिती देणे हे केवळ कायद्याचे उल्लंघनच नाही तर ज्यांना खरोखर तात्काळ मदतीची आवश्यकता आहे अशा गरजू लोकांना मदत करण्यात अडथळा देखील आहे. भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिस विभागाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खोट्या तक्रारी” चा परिणाम काय होतो?. ..

खोटी माहिती किंवा तक्रार देणे, हे खूप गंभीर आणि कायदेशीर परिणाम घडवून आणू शकते. जर तुम्ही पोलिसांना खोटी माहिती दिली, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते.