चंद्रपूर: ब्रम्हपुरी वन विभागाच्या तळोधी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आकापूरच्या शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात सौ दुर्गा जीवन चनफने (४७) ही महिला ठार झाली. सदर घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पावसाळा सुरू होताच शेतात कामाला सुरुवात झाली आहे. सौ दुर्गा जीवन चनफने ही महिला शेतात काम करण्यासाठी गेली होती. उशीर झाल्यावरही ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला असता शेताच्या मार्गावर तिचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा… अकोला: नाल्याला आलेल्या पुरात १० वर्षीय मुलगा वाहून गेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दबा धरुन बसलेल्या वाघाने दुर्गा हीच्यावर हल्ला केला व ठार केले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, तीन दिवसापूर्वीच या परिसरातील नागरिकांनी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी वन विभागाकडे केली होती. परंतु वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले.