चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्याची जबाबदारी एका दिवसासाठी महिलांनी सांभाळली आहे. सात पोलिस ठाण्यात आज प्रमुख म्हणून महिला अधिकारी जबाबदारी पार पाडत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. २४ तासांसाठी संपूर्ण महिला पोलीस ठाणे प्रमुख म्हणून काम सांभाळणार आहे.

यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी पो.नी. वडिवे कर्तव्य बजावत आहेत. तर बल्लारपूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक राजूरकर, वरोरा येथे पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे, मुल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नेहा सोळुंखे या संपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. पोलीस मुख्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक रामटेके यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी, अदानी विरोधात घोषणा देत काँग्रेसचे नागपुरात आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – बुलढाणा : बिबट्याचा हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी

शहरातील कोतपल्लीवार पेट्रोल पंप येथे आज दिवसभर महिला काम करीत आहेत. तर बस स्थानक व जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला कर्तव्य बजावत आहेत.