लोकसत्ता टीम

चंद्रपूर : भद्रावती लगतच्या बरांज येथील एम्टा कोळसाखान परिसरात एका कामगाराने सीट बेल्टच्या सहाय्याने एका ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

आणखी वाचा-धानाचे पोती नेणारा ट्रक उलटला, वेग वाढविणे आले अंगलट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय मोचीराम (२६)असे मृतकाचे नाव आहे. मृतक ओरिसा राज्यातील रहिवासी आहे. घटनेची माहिती प्राप्त झाल्यावर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर युवक हा एम्टा कोळसाखान कंपनीत कार्यरत असलेल्या एक्सप्रेस कंपनीत मेकॅनिकल म्हणून होता अशी माहिती कळते. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी मृतकाच्या ओरिसा येथील नातेवाईकांना याची माहिती दिली असून घटनेचा पुढील तपास करीत आहे.