अमरावती : शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन कापण्‍यासाठी कुणी अधिकारी आले तर त्‍यांना तिथेच झोडा, अशा शब्‍दांत काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपला संताप व्‍यक्‍त केला आहे. शेतकऱ्यांच्‍या विजेला हात लावू नका, असा सज्‍जड दमही त्‍यांनी महावितरणच्‍या अधिकाऱ्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील काही शेतकऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची तक्रार ऐकल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी भर बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

हेही वाचा – “मी बोललो तर अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाईल”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

गेली दोन वर्षे करोना होता, लोकांनी काय आत्महत्या करायची का, तुम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कसे काय कापत आहात, असा सवाल त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नका, हे निर्दयी सरकार आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरदेखील टीका केली.

हेही वाचा – “अनिल देशमुखांना भाजपाची काय गरज होती हे वेळ आल्यावर सांगू”; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

अधिकारी वीज कनेक्शन कापण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा, असा अजब सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. या संपूर्ण प्रकाराची चित्रफित प्रसारीत झाली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करण्याचे काम मागील काही दिवसांपासून हाती घेतले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, महावितरणच्या या कारभारामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. तिवसा येथील आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी तक्रार करताच यशोमती ठाकूर आक्रमक झालेल्‍या पहायला मिळाल्‍या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur controversial statement in amaravati on farmers electricity connection mma 73 ssb
First published on: 14-02-2023 at 15:13 IST