नागपूर : येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट , तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत साधारण पावसाचा यलो अलर्ट इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन ते उत्तर-पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असल्याने एकूणच पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतली आहे.

हेही वाचा >>>फिरत्या बसमध्ये अभ्यासाचे घडे, नागपुरात स्त्यावरील मुलांसाठी अभिनव उपक्रम

परंतु येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट , तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत साधारण पावसाचा यलो अलर्ट इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>Kuno National Park: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत २० पैकी नऊ चित्ते दगावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.