बुलढाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली. यामुळे दुर्गा मातेच्या उत्सवावर विरजन पडले गावात शोक कळा पसरली आहे.
साखर खेर्डा येथील वार्ड क्रमांक एक मधील देवीच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करताना एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नवरात्रोत्सव पुर्वसंध्येला ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
जालना येथील रहिवासी सतीश विटेकर (वय २३ वर्ष) हा मामा दत्ता लष्कर यांच्याकडे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी आला होता. वडार समाजाचे कुलदैवत जगदंबा माता मंदीर वार्ड क्रमांक एक मध्ये असून त्या मंदिरावर विद्यृत रोशनाई करण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला . नेमके त्या मंदिराच्या परिसरात मेहकर ते साखरखेर्डा ३३ के व्ही सबस्टेशनला जोडणारी वीज तार गेली आहे . सतीश हा मंदिरावर चढला असता चार ते पाच फुट अंतरावर असलेल्या ३३ के व्ही विज प्रवाहामुळे तो खेचला गेला .
काही कळण्यापुर्वी हा युवक खाली पडून दगवला . ही घटना घडली असताना मामा दत्ता लष्कर आणि इतर नातेवाईक तेथेच उपस्थित होते . सतीश यास तातडीने चिखली येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . नवरात्रोत्सव पुर्व संध्येला ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे . चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कार करण्यासाठी त्याचा मृत देह जालना येथे नेण्यात आला आहे .