News Flash

दिंडोरीतील पाच द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना १७ लाखांहून अधिक रकमेस फसविण्यात आले.

सहा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : जिल्ह्य़ात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरुच आहेत. दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना १७ लाखांहून अधिक रकमेस फसविण्यात आले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातून परदेशात द्राक्ष निर्यातीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांना फसविण्याच्या घटना कायम होत असतात. दिंडोरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रोरीनंतर गुन्हे दाखल झाले आहेत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द तक्रोर के ली. या संपूर्ण प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कं पनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

सुनील शिंदे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करत त्यांच्या शेतातील ११,२८६ किलो माल खरेदी करून त्याचे पाच लाख २६ हजार १७१ रुपये व्यवहार व्यापाऱ्याने ठरविला. परंतु, व्यवहाराचे रोख पैसे न देता धनादेश देत शिंदे यांची बोळवण करण्यात आली.

धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याने दुसरा धनादेश दिला. तोही न वटल्याने फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. दुसऱ्या घटनेत निगडोळ येथील अनिल मालसाने यांच्या शेतातील आठ हजार ७०१ द्राक्ष खरेदी करत व्यवहारात चार लाख, आठ हजार ५०५ रुपये देणे ठरले. हे पैसे मालसाने यांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीवर संपर्क साधत मिळविण्याचा प्रयत्न के ला. परंतु, उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली.

तिसऱ्या घटनेत नळवाडी येथील संजय वाघ यांच्या शेतातील नऊ हजार २६७ किलो द्राक्ष संशयिताने खरेदी करुन व्यवहार पाच लाख ९८ हजार, ८५५  रुपयांमध्ये ठरवला. द्राक्ष खरेदी करतांना संशयितांनी वाघ यांना चार लाख रुपये आरटीजीएसने दिले. उर्वरीत एक लाख ९८ हजार, ८५५ रुपये मिळविण्यासाठी वाघ यांनी संशयितांशी प्रत्यक्ष संर्पक साधला. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चौथ्या घटनेत शरद मालसाने यांनी संशयितांना सहा हजार ६८५ किलो द्राक्षे विकली. खरेदी करतांना संशयितांनी मालसाने यांना २५ हजार रुपये दिले. मात्र व्यवहारातील उर्वरीत तीन लाख, ७६ हजार ९० रुपये मागितले असता धनादेश दिला. तो वटला नाही. पाचव्या घटनेत वलखेड येथील रघुनाथ पाटील यांच्या शेतातील सहा हजार ५०३ किलो द्राक्ष माल संशयितांनी खरेदी के ला. यासाठी व्यवहारात दोन लाख, ८२ हजार ३६५ रुपये देणे ठरले. मात्र संशयितांनी पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप हे पैसे परत के ले नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांमध्ये पाच संशयितांचा समावेश आहे. यासंदर्भात शेतकरी तक्रोरीसाठी पुढे येत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. शेतकऱ्यांनी व्यवहार करतांना खबरदारी म्हणून माल देतांनाच पैसे घ्यावेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच बँके ची हमी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

– सचिन पाटील (जिल्हा पोलीस अधिक्षक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:37 am

Web Title: fraud of five grape growers in dindori ssh 93
Next Stories
1 पीक कर्जवाटपात जिल्हा बँक असमर्थ
2 वाहनधारक वेगावर स्वार
3 गॅस टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत
Just Now!
X