नाशिक : दिंडोरी येथे चार वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करुन वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला.

दिंडोरी येथील जाधव वस्तीवर शनिवारी रात्री चार वर्षांचा रुद्र जाधव हा आजोबा दत्तात्रय जाधव यांच्यबरोबर रस्त्याने जात असतांना बिबट्याने त्याच्यावर झडप घालत त्याला फरफटत नेले. दोन तास शोध घेतल्यानंतर रुद्र जखमी अवस्थेत सापडला. रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णाललयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मागील महिन्यातच बिबट्याचा हल्ल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेमुळे संतप्त दिंडोरीतील नागरिकांनी नाशिक-सापुतारा मार्गावर आंदोलन केले. शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बिबट्या मारण्याची परवानगी देण्याची मागणी केली.