नाशिक : सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे बुधवारी रात्री पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

निमगाव परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे सातत्याने करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत संजय टोक या शेतकऱ्याच्या शेतात वनविभागाकडून बिबट्याला जाळ्यात अडकवण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बुधवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली.

हेही वाचा…नाशिक : “रोजगार दो, न्याय दो” युवक काँग्रेसची यात्रेव्दारे मागणी

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या अडकल्याची माहिती देताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या नर असून दीड वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिन्नर परिसरातील माळेगाव येथील नामदेव काकड यांच्या शेतात बुधवारी सकाळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिले (शावक) शेतकऱ्यांना दिसली. सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लांना आईला भेटता यावे, यासाठी त्यांना टोपलीखाली ठेवले. अंधार पडल्यावर बिबट्या मादी पिल्लांना सुरक्षितरित्या घेऊन गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.