नाशिक: तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे शाळकरी मुलावर हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे नाशिकरोड भागात जय भवानी रस्ता परिसरात वन विभागाच्या जाळ्यात एक बिबट्या अडकला. अजूनही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पिंपळगाव खांब येथे नऊ वर्षाच्या अभिषेक चारोस्करवर बिबट्याने रविवारी हल्ला केला होता. हा प्रकार घडल्यानंतर काही तासातच जयभवानी रस्त्यावरील पाटोळे मळा या लष्करी केंद्रालगत असलेल्या भागात बिबट्याचे दर्शन झाले. दीड महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. पुन्हा त्याच परिसरात बिबट्या दिसल्याने शिवसेना महिला आघाडीच्या योगिता गायकवाड आणि इतर रहिवाशांच्या मागणीनुसार वन विभागाने या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.

हेही वाचा… धुळ्यात मालमत्ता करवाढीमुळे भाजपची कोंडी, अजित पवार गट आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यरात्री पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. पिंजऱ्याबाहेर आणखी एक बिबट्या असल्याचे रहिवाशांना दिसून आले. बिबट्याला अडकविण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात येणार आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास वन अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचारासाठी गंगापूर येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले. जेरबंद बिबट्या मादी असून गरज पडल्यास या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात येईल, असे वन अधिकारी गाढे यांनी सांगितले.