जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारासाठी आयोजित केलेल्या रोड शो दरम्यान शनिवारी अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईला परत जावे लागलेला अभिनेता गोविंदा दुसऱ्याच दिवशी रविवारी जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील रोड शोसाठी पुन्हा उपस्थित राहिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. गोविंदाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, पाचोरा, एरंडोल-पारोळा आणि चोपडा या पाच मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ रोड शो आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्यात हेलिकॉप्टरने दाखल झाला होता. मुक्ताईनगर-बोदवडमधील रोड शो आटोपून पाचोऱ्यात आगमन झाल्यानंतर अचानक छातीत दुखू लागल्याने गोविंदाने रोड शो अर्धवट सोडून मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा…नाशिक: सिडकोत पोलीस संचलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गटाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड त्यामुळे झाला होता. त्याबद्दल गोविंदाने जाहीर माफी मागितली होती. परंतु, रविवारी सकाळीच अभिनेता गोविंदा राहिलेला रोड शो पूर्ण करण्यासाठी कासोद्यात येत असल्याचा निरोप मिळाला. परिणामी, शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांची एकच धावपळ उडाली. ठरल्यानुसार गोविंदाने रविवारी कासोदा येथे दुपारी रोड शोमध्ये भाग घेतला. हिंदी चित्रपटातील हटा सावन की घटा हा डायलॉग बोलून उपस्थित तरूणांची मने जिंकली.