लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: केंद्र सरकारच्या उडान योजना टप्पा पाचच्या आरएसी उपक्रमांतर्गत पुणे, गोवा, हैदराबादसाठी जळगावातून विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये एअर डेक्कन कंपनीच्या माध्यमातून जळगाव विमानतळावरून मुंबई, अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या वर्ष-सव्वा वर्षात ती बंद पडली.

नंतर वर्षभराच्या खंडानंतर पुन्हा टू जेट या कंपनीची सेवा सुरू झाली होती. ती सेवाही नंतर खंडित झाली. त्यानंतर जळगाव विमानतळाचे अत्याधुनिकीकरणही झाले. जळगावातून नियमित प्रवासी विमानसेवा बंद असल्याने उद्योजकांसह व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. पुणे, हैदराबाद यांसारख्या महानगरांमध्ये जळगावातून रोज हजारो जण प्रवास करीत असताना जळगाव ते पुणे आणि पुणे ते जळगाव विमानसेवेची मागणी होत होती.

हेही वाचा… चांदसैली घाटातून जाण्याचा विचार बदला… संरक्षक भिंत उभारणीसाठी घाट महिनाभर बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार उन्मेष पाटील यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी कंपन्यांशीही चर्चा केली. खासदार पाटील यांच्या पाठपुराव्यास यश येऊन आता जळगाव विमानतळाचा समावेश उडान योजना टप्पा पाचअंतर्गत क्षेत्रिय संपर्क सेवेत (रिजनल कनेटक्टिव्हिटी सर्व्हिसेस) समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच जळगावच्या आकाशातून विमाने उड्डाण करतील. जळगावसह जिल्ह्यातील अनेक युवक हैदराबादमधील आयटी कंपन्यांत नोकरीला असून, जळगावकर पर्यटकांनाही गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.