उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आपल्या खास शैलीमध्ये सोमवारी नाशिकमधील येवला येथील कार्यक्रमामध्ये भाषण करताना निशाणा साधला. राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी राज ठाकरे यांनी नेमकं काय काम महाराष्ट्रात केलंय असा सवाल उपस्थित करत पवारांच्या कामाचा पाढा वाचून दाखवला. येवला शिवसृष्टी भूमिपूजन समारंभाच्या वेळी बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

नक्की पाहा हे फोटो >> ‘सरड्यासारखे रंग’, ‘सुपारी’, निवांत सभा अन् नक्कल करत म्हणाले “काय एकदाचं…”; अजित पवारांची राज ठाकरेंविरोधात टोलेबाजी, बॉडीगार्ड्सही लागले हसू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मित्रांनो आज आपण काय बघतोय. कशा करता लोकांना आता भोंगे आठवले. कशा करता सभा घेतल्या जाताय. आता कुठल्या निवडणुका आहेत का? लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरुय सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेऊन गेले ५५ वर्ष काम करणाऱ्या शरद पवारांना तुम्ही जातीयवादी म्हणता,” असा प्रश्न अजित पवारांनी आपल्या भाषणामधून उपस्थित केला.

“बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापिठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या वेळेस मी आमदार होतो. नागपूरला रात्री देवगिरी बंगल्यावर आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आमच्या देखत काही आमदारांनी सांगितलं तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. पवारांनी भाषणात सांगितलं की शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मी पुरोगामी विचारांचं चाक उलटं फिरु देणार नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं,” अशी आठवण आजित पवारांनी सांगितली.

नक्की वाचा >> “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे…”; बाबरी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

तसेच पुढे बोलताना, “सत्तेसाठी ते कधीच हापहापलेले नव्हते. चार वेळा मुख्यमंत्री तर दहा वर्षे केंद्रीय कृषीमंत्री होते. काही वेगळा प्रसंग घडला तर देशाला एकत्र करण्याचं काम पवारांनी केलं हा इतिहास नाकारु शकत नाही,” असंही ते म्हणाले. राज ठाकरेंवर निशाणा साधताना, “त्याचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवारांचं राजकारणामधील आयुष्य आहे. हे काय गप्पा मारताय,” असा टोला अजित पवारांनी लगावला. तसेच पुढे बोलताना, यांना पण काही काळ १९९५-९९ जेव्हा भाजपा शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांना कामं करता आली असती ना, असंही अजित पवार म्हणाले.

पवारांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केल्याचा दाखला देत अजित पवार यांनी, “लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम करणाऱ्या या व्यक्तीनं कुठला साखर कारखाना उभा केलाय? कुठली शेत गिरणी उभी केलीय? कुठली शिक्षण संस्था काठली? काय काम केलं मला सांगा ना,” असे प्रश्न उपस्थितांना विचारले.

नक्की वाचा >> “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी…”; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

“ठिकं आहे बाबा, तुम्ही स्वत: नाही केलं. दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली? कधी शब्द खर्ची केला? काही व्हीजन दाखवलं अहो साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्याने. दूध सोसायटी नाही, टरबूज-खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, महसूल सोसायटी नाही
या सोसायट्या त्यांना कळतच नसतील. काय सोसायट्या सोसायट्या. नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला,” अशा आपल्या खास शैलीमध्ये अजित पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slams raj thackeray in yewala specch scsg
First published on: 03-05-2022 at 11:47 IST