नाशिक – ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात दामले यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अक्षय्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून शाल, श्रीफळ, रु. २५०००, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा – जळगावात व्यापार्‍याची आठ लाखांची रोकड असलेली थैली लंपास

हेही वाचा – जळगावात व्यापार्‍याची आठ लाखांची रोकड असलेली थैली लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरस्कार सोहळ्यानंतर दामले यांची प्रकट मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार आहेत. मागील दोन वर्षे करोनामुळे पुरस्कार वितरीत होऊ शकला नाही. याआधी सामाजिक कार्यासाठी डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे, क्रीडासाठी कविता राऊत, प्रशासनासाठी माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, संगीतसाठी पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटासाठी सचिन पिळगांवकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी केले आहे.