नाशिक: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. या पार्श्वभूमिवर, नाशिक शहर पोलिसांच्या वतीने शहरात सध्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्या चालकांचे प्रबोधन करण्यात आले.
शहर परिसरात १४ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान चालू राहणार आहे. या अंतर्गत वाहतूक नियमांविषयी सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे. जुने नाशिक येथील महानगरपालिकेच्या उर्दू शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी द्वारका चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देवून स्वागत केले. तसेच वाहतुकीच्या विविध नियमांविषयी पत्रकाद्वारे माहिती दिली.
हेही वाचा… अबब… ११,९२० गुन्हेगारांवर कारवाई; जळगाव पोलिसांची वर्षभरातील कामगिरी
सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. सचिन बारी, यतीन पाटील तसेच शिक्षक उपस्थित होते. वाहन चालवतांना नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आले.