धुळे जिल्यातील १२८ ग्रामपंचायतींपैकी दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालात भाजपने २५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी २, शिवसेना ठाकरे गट एक, शिंदे गट ७ तर महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय संपादन केला आहे. शिंदखेडा तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे वर्चस्व सिद्ध झाले असून तालुक्यातील २३ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपप्रणित गटाची सत्ता आली असून केवळ एका ग्रामपंचायतीवर काँग्रेसला सत्ता राखता आली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: एका विवाहाची चर्चा.. करोनातील विधवेला उच्चशिक्षित युवकाची साथ

धुळे तालुक्यातील सिताणे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजय संपादन केला असून रंजनकुवर जाधव सरपंचपदी विजयी झाले आहेत.धमाने येथे मिराबाई ठाकरे या महाविकास आघाडीकडून विजयी झाल्या आहेत.शिंदखेडा तालुक्यातील नेवाडेच्या सरपंचपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोहिणी साळुंखे विजयी झाल्या आहेत.याठिकाणी माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: आर्थिक परिस्थितीला कंटाळून नवदांम्पत्याची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरडाणा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या संजीवनी सिसोदे यांना धक्का बसला आहे. चिमठाणे.ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे यांच्या पत्नीचा पराभव झाला. न्याहळोदच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार कविता वाघ या विजयी झाल्या आहेत. मांडळच्या सरपंचपदी काँग्रेसचे डॉ.संदीप पाटील विजयी झाले.नरडाण्यात मनीषा सिसोदे यांनी महाविकास आघाडीतर्फे विजय मिळविला. होळपाड्यात काँग्रेसच्या संभाबाई खुर्णे सरपंच झाल्या. फागण्यात भाजपने बाजी मारली असून विद्या पाटील सरपंच झाल्या आहेत.