धुळे येथील एमआयडीसीमधील पतीच्या नावे असलेला भूखंड परत मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुनही न्याय न मिळाल्याने शीतल गादेकर या महिलेने मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेनंतर धुळे पोलिसांनी भूखंड हडपणार्या नरेशकुमार मुनोतसह एमआयडीसी विभागाच्या अधिकार्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शीतल गादेकर (रा.लक्ष्मी हॉटेल, प्लॉट नं.१६, एमआयडीसी धुळे, हल्ली मुक्काम पुणे) या महिलेचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावाने धुळे एमआयडीसी परिसरात नं.१६ हा प्लॉट आहे. हा प्लॉट नरेशकुमार मुणोत यांनी खोटी नोटरी करुन एमआयडीसीच्या अधिकार्यांशी संगनमत करुन जबरदस्तीने हडपला असल्याची तक्रार शीतल गादेकर यांनी येथील पोलीस अधीक्षकांसह मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांकडे आणि मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्यांकडे केली होती.

हेही वाचा >>>चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक

ही तक्रार गादेकर यांनी २१ मार्च रोजी केली असली तरी २०२०२ पासून शीतल या तक्रारीचा पाठपुरावा करीत होत्या. मात्र, तरीही त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी २७ मार्च रोजी मुंबई येथील मंत्रालयासमोर विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. शीतल यांचा मृत्यू झाल्यानंतर धुळे पोलिसांनी मुनोतसह एमआयडीसीच्या अधिकार्यांवर मोहाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तब्बल तीन वर्ष ज्या गोष्टीसाठी पीडिता पाठपुरावा करीत होत्या. ती मागणी त्यांच्या मृत्यूनंतर पुर्ण झाली.

हेही वाचा >>>वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शीतल गादेकर यांनी आमच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी वेळोवेळी संपूर्ण चौकशी झाली होती. परंतु, त्या महिला समाधानी नव्हत्या. यामुळे त्यांना दिवाणी न्यायालयात आणि एमआयडीसी अधिकार्यांकडे दाद मागण्याचे कळविले होते. या प्रकरणात उशीर झाला असे म्हणता येणार नाही. शिवाय, या प्रकरणात आरोपीने काही संशयास्पद प्रकार केला असेल, तर या प्रकरणाचा पुढेही सखोल तपास केला जाईल.- संजय बारकुंड ( पोलीस अधीक्षक, धुळे जिल्हा)