नाशिकमधील सिन्नर येथील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, या माध्यमांतून महिला वा युवतींची विक्री झाली का, यासह राज्यातील ज्या ठिकाणी अनधिकृतपणे मानवी विक्री अथवा शोषण होते, अशा सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

हेही वाचा- ठाकरे गटाची हिंदू मते वळवण्याची रणनीती; भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ठराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघ यांनी सिन्नर येथील पीडित महिलेवर अत्याचार करुन धर्मांतर करण्याचे आणि विक्री करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणामागे एखादी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सिन्नर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. अशा कामासाठी अडलेल्या काही महिलांची विक्री झाली का, कोणावर अत्याचार झाले का, अनधिकृतपणे सुरू असलेली मानवी विक्री याची सखोल चौकशी करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्याचे वाघ यांनी सांगितले.