धुळे : ‘भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे’ अशी टॅग लाईन देऊन आज शिवसेनेतर्फे (उबाठा) झालेले फलक आंदोलन धुळेकरांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, प्रशांत भदाणे यांनी केले.खड्डेमय झालेल्या या रस्त्यांसाठी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रचंड टक्केवारी घेतली, त्यामुळे आज धुळे शहरातील रस्त्यांची ही अवस्था झाली असा आरोप यावेळी करण्यात आला.या पार्श्वभूमीवर ‘भ्रष्टाचाराच्या अड्डा, टक्केवारीचा खड्डा’ या टॅगलाईनचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
शहरात सध्या प्रचंड प्रमाणात बेमोसमी पाऊस सुरू असून या पावसामुळे आधीच धुळेकर त्रस्त झाले असताना, पावसाळ्याच्या चारही महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ऑक्टोबर महिन्यात झाला, त्यामुळे आधीच पावसाळ्यात धुळे शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचे ठिकठिकाणी धुळेकरांनी पाहिले, गणपती उत्सव असो की दिवाळी यात मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातील असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून धुळेकरांना मिळत राहिले.मुळातच धुळे शहराच्या रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी आणल्यानंतर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या व्यासाचे दीड – दोन फूट खोल खड्डे झाले आहेत, पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचून सर्वप्रमुख रस्ते जलमय झाले आहे. या रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यांमुळे आपल्या दुचाकी सह पडून गंभीर रित्या जखमी होत आहेत.
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असतानाही महानगरपालिकेला जाग आली येत नाही, किमान जीवघेणे खड्डे किमान खडी टाकून बुजवीणे शक्य आहेत, पण महानगरपालिका प्रशासनाकडून अवाच्या सव्वा अंदाजपत्रके बनवून रस्ते तयार करण्यातधन्यता मानण्यात येते.यामुळे बहुतेक रस्त्यांची कामे योग्यरीत्या झाली नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रसंगी अनेक नागरिकांनी देखील शिवसेनेच्या आंदोलनात भाग घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला व महानगरपालिका प्रशासनातील टक्केवारीच्या विरोधात आवाज उठवला. शिवसेना उबाठा पक्षाने बनवलेले बॅनर सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारी व भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी प्रशांत ठाकूर, अण्णा फुलपगारे, डॉ.अनिल पाटील,शिवाजी शिरसाळे ,दिनेश पाटील, कपिल लिंगायत, विष्णू जावडेकर , अनिल शिरसाट ,नितीन देशमुख, योगेश पाटील, आशुतोष कोळी, सचिन शिंदे, चंद्रशेखर शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खड्डे असलेला परिसर
धुळे शहरातील गणपती रोड वरील महानगरपालिका पंप स्टेशन समोर, काजवे पूल काजवे पूल सिद्धेश्वर हॉस्पिटल सिध्देश्वर हॉस्पिटल, स्टेशन रोड, फाशी पुल,दसेरा मैदान, पारोळा रोड थेट कृषी महाविद्यालयापर्यंत, देवपूर, शिवतिर्थ, चाळीस गाव रोड, धुळे शहर पोलिस स्टेशन, श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे झाले असून त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक गंभीरित्या जखमी झाले आहेत.
