लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: संक्षिप्त मतदार यादी मोहिमेंतर्गत घरोघरी मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० टक्के गृहभेटी दृष्टीपथास आल्या आहेत. शहरी मतदारसंघाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारसंघात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) चांगले काम केले आहे. या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाल्याने तिची मुदत वाढविली गेली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत महिनाभरापासून निवडणूक विशेष संक्षिप्त मोहिमेंतर्गत नवमतदार नोंदणी तसेच मतदार यादी दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची नोंद करीत आहेत. या मोहिमेला नाशिकसह राज्यभरातून फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… नाफेडची १० केंद्रे कार्यान्वित, शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात ४६ लाख ४० हजार ७७७ हजार मतदार आहेत. यातील केवळ आठ लाख ९५ हजार ३४६ मतदारांपर्यंत बीएलओ पोहचू शकले. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के आहे. शहरी भागातील मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारसंघात बीएलओंनी चांगले काम केल्याचे दिसून येते. मोहिमेतील कामकाज लक्षात घेऊन आयोगाने घरोघरी मतदार नोंदणी मोहिमेला मुदतवाढ देतानाच बीएलओंमार्फत ऑफलाईन अर्ज भरून घेण्याचे सूचित केले आहे.