लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: गेल्या पंधरा दिवसापासून सततच्या पावसाळी वातावरणामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक अद्याप रूळावर आलेले नाही. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून विविध मार्गाने जाणाऱ्या प्रवासी गाड्या एक ते सहा तासाच्या विलंबाने धावत होत्या.

काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. तेव्हापासून विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. पाऊस कमी झाल्यावर वेळापत्रक काहिसे सुरळीत होईल असे वाटत असताना पुन्हा ते विस्कळीत झाले.

हेही वाचा… मालेगाव: करोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास विलंब, दोन वर्षे होऊनही प्रतिक्षा; आम्ही मालेगावकर संघटनेची तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. यात तिरूपती साईनगर शिर्डी तीन तास, निझामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस सहा तास, जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस दोन तास, नागपूर-पुणे तीन तास, कुर्ला-गोरखपूर तीन तास, गोरखपूर-कुर्ला पाच तास, वाराणसी-कुर्ला दोन तास तर, कुर्ला-जयनगर पवन एक्स्प्रेस दोन तासाच्या विलंबाने धावत होती.