नाशिक : गणेशोत्सवात मुभा मिळाल्याने शहरातील मुख्य मिरवणुकीसह वेगवेगळ्या भागात निघालेल्या मिरवणुकीत आवाजाच्या भिंती उभारल्या गेल्या. यात ध्वनिप्रदूषण विषयक नियमांचे उल्लंघन झाल्याने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विना परवानगी मिरवणूक काढल्या प्रकरणी एका मंडळाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मंडळांच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी नियमांच्या मर्यादेत आवाजाच्या भिंती उभारण्यास मुभा दिली होती. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित मंडळांनी मिरवणुकीत या वाद्याला पसंती दिल्याचे पहायला मिळाले. जेलरोडचा राजा मित्र मंडळाने आवाजाच्या भिंती उभारून मिरवणूक काढली. ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन केले नाही. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गामणे, सुमित साठे यांच्यासह ध्वनी यंत्रणेचा चालक उमेश कुमावत यांच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा…Sandalwood Stock Seized In Nashik : म्हसरुळ शिवारात ३५ लाखांचा चंदन साठा जप्त

शहरातील मुख्य मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी युनायटेड महिला सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी या फाउंडेशनने स्वागत कक्ष उभारला होता. तिथे ध्वनिप्रदूषण विषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा…नाशिक : पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या – इंदिरानगरमधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकरोड भागात सैलानी बाबा येथील हिंद शक्ती मित्र मंडळाने विनापरवानगी मिरवणूक काढली. ध्वनी यंत्रणेचा वापर केला. या प्रकरणी मंडळाचे मंगेश गवारे, विवेक बेग यांच्यासह ध्वनि यंत्रणेचा चालक शुभम बर्डे यांच्याविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.