नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गत सात ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आठ संवर्गांची परीक्षा होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघु लेखक (निम्नश्रेणी), लघु लेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक लेखा या संवर्गातील पदांसाठी सात ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीच्यावतीने विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. सात ऑक्टोबर रोजी रिगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), आठ ऑक्टोबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), १० ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक आणि ११ ऑक्टोबर रोजी लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गाची परीक्षा होईल.

हेही वाचा – नाशिक : श्रमदानासह छायाचित्र काढण्याचीही लगबग, स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा उत्साह

हेही वाचा – नाशिक : बोधी वृक्षारोपण महोत्सवात दलाई लामांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग, सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भातील जिल्हा परिषद पद भरतीचे सुधारित वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. संकेतस्थळावरून परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.