नाशिक : सप्तश्रृंग गडावर दर्शनाला निघालेल्या भाविकांचे वाहन उलटून १४ जण जखमी झाले. यात तीन लहान बालकांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हा अ्पघात झाला. बागलाण तालुक्यातील दोधेश्वरजवळील काळीपाडा येथील सुमारे २५ भाविक एका मालवाहू वाहनातून दर्शनासाठी गडावर निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जाते.
वाहन उलटून खोल चारीत गेले. या अपघातात १४ जण जखमी झाले. यामध्ये सोनाबाई जाधव, सुनिता लवारे, सीमा कावळे, शिवानी गायकवाड, वर्षा गायकवाड, शितल गायकवाड, ज्ञानदा पवार, शिवानी पवार (सात वर्ष), अभिजीत गायकवाड (चार वर्ष), शंकर गायकवाड, ज्योती गायकवाड, दत्ताबाई पवार, शुभम गातवे, यश घोडे यांचा समावेश आहे. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तीन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना दुसरीकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.