लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: चोरी, वाहनचोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच नोंदीतील गुन्हेगारांच्या तपासासाठी नाशिक परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात मंगळवारी रात्री मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. तसेच उपनगर परिसरात चार संशयास्पद दुचाकी पडताळणीसाठी जमा करण्यात आल्या.

आणखी वाचा-नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सापडेना, आता फलकाद्वारे माहिती देण्याची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार परिमंडळ दोनमधील अंबड एमआयडीसी चौकीच्या|हद्दीत तसेच उपनगर ठाणे परिसरात मंगळवारी रात्री उपआयुक्त मोनिका राऊत यांनी पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना तपासणीची सूचना केली. उपआयुक्त राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, आनंदा वाघ यांनी प्रभारी अधिकारी, अंमलदार यांना मार्गदर्शन केले. नोंदीतील तसेच तडीपार अशा एकूण ५२ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दोन चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयित हरीओम सिंग (२०, रा.घरकुल चुंचाळे योजना, अंबड) यास ताब्यात घेण्यात आले. चार जणांना कायदेशीर आदेश देण्यात आला.