आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस यांची युती यांच्यात टफ फाईट होणार आहे. परंतु, त्याआधी आघाडी आणि युतीतील जागावाटपाचा सर्वांत मोठा तिढा उभा राहणार आहे. कोणत्या पक्षाला किती जागा आणि कोणत्या जागा मिळणार आहेत याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. याकरता सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरून पक्षाच्या कार्यक्षमतेचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागावाटपासंदर्भात चाचपणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती दिली. आज ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

“नाशिक नाही तर पुणे, बारामती, धुळे, जळगाव, गडचिरोली अशा अनेक वेगवेगळ्या लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीची साधारण कुठे शक्ती आहे, तिथली परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती काय आहे? याबाबत स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भात निश्चित धोरण आणि निर्णय घेण्यात येतील. यासाठी पवार साहेबांनी दोन दिवस ऐकून घेतलं आहे. ५ तारखेला पुन्हा पुण्याला शिरूर वगैरे पाच – सहा लोकसभा जागांबाबत चर्चा करणार आहेत. या बैठकीतून माहिती घेण्याचा उद्देश आहे, कोण कुठे मजबूत लढू शकतो. उलट सुलट प्रश्न विचारून स्थिती जाणून घेतली जात आहे, यावरून संपूर्ण आराखडा तयार केला जात आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >> Video : जागा वाटपाबाबत काँग्रेसचं काय ठरलं? बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदनगरला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत छगन भुजबळांना विचारले असता त्यांनी या नामांतराला समर्थन दिले आहे. नामांतराला आमचा विरोध नाही. आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याच विचारांचे आहोत. परंतु, दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाईंचा पुतळा हटवला नाही पाहिजे, एवढंच करा, असं छगन भुजबळ म्हणाले.