जळगाव : अमळनेर येथे दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी ही माहिती दिली. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात एक फेब्रुवारी रोजी संमेलनपूर्व कार्यक्रम म्हणून बालमेळावा होणार आहे.

यात बालनाट्य तसेच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाट्य प्रवेश, नाट्यछटा, गाणी सादर होतील. दोन फेब्रुवारी रोजी संमेलनाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर १०.३० वाजता ध्वजवंदन, ग्रंथदालनाचे उद्घाटन, दुपारी दोन वाजता बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादरीकरण, दुपारी ३.३० वाजता मुख्य सभागृहात राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ५.३० वाजता कविसंमेलन आणि रात्री ८.३० वाजता स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुसर्या सभागृहात दुपारी २.३० वाजता कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक या विषयावर परिसंवाद, दुपारी ३.३० वाजता शासकीय परिसंवाद, सायंकाळी पाच वाजता स्थानिक वक्ते स्वातंत्र्यसंग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर भाषण करणार आहेत.

Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

हेही वाचा : राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद, विदेशातून कमी मागणीसह कापूस उत्पादन घटल्याचा परिणाम

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गिरीश प्रभुणे यांची मुलाखत, मुख्य मंडपात ११ वाजता आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का ? आणि दुपारी १२ वाजता अलक्षित साने गुरुजी या विषयावर परिसंवाद होईल. यात साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी दोनला आंतरभारती काल-आज-उद्या परिसंवाद, सायंकाळी सहाला कविसंमेलन-दोन, रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सभागृह क्रमांक दोनमध्ये सकाळी १० वाजताचैत्राम पवार यांची मुलाखत, ११ वाजता मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे, या विषयावर परिसंवाद, दुपारी १२.३० वाजता स्थानिक बोलीभाषेवर कार्यक्रम, दुुपारी १.३० वाजता कथाकथन, दुपारी चारला कळ्यांचे निःश्वास परिचर्चा, सायंकाळी सहाला स्थानिकांचे अभिवाचन, असे कार्यक्रम होतील.

हेही वाचा : नाशिक: महापालिकेची फसवणूक प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्याविरुध्द गुन्हा

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी, चार फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता बाबासाहेब सौदागर यांची मुलाखत, १०.३० वाजता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत, या विषयावर अभिरुप न्यायालय, दुपारी १२ वाजता मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल या विषयावर परिसंवाद, दुपारी तीनला लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसर्या मंडपात सकाळी ९.३० वाजता वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य विषयावर परिसंवाद, ११ वाजता साहित्यिकांचे शताब्दी स्मरण यात शाहीर साबळे, जी. ए. कुलकर्णी, के. ज. पुरोहित- शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक आदी साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दुपारी दोनला भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. तसेच दोन दिवस कविकट्टा, एक दिवस गझलकट्टा हे कार्यक्रमही होणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिध्द केले आहे.