जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी २६ ऑगस्टला होणारा पाचोरा दौरा तूर्त स्थगित झाला आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी दिली. शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी राज्य शासनातर्फे शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्हानिहाय सुरू आहे.

याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा उपक्रम पाचोरा येथे करण्याचे नियोजन होते. औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल यांसह विविध विकासकामांचेही भूमिपूजन, उद्घाटन या दौऱ्यात केले जाणार होते.

हेही वाचा : कांदा निर्यात शुल्कविरोधात राष्ट्रवादीही मैदानात, नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय, पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर करण्यात आले होते. आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनीही सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले होते.