नाशिक : इगतपुरी शहरातील तीन कुख्यात गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे इगतपुरीत स्वागत होत आहे. इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार कऊ भाई उर्फ फ्रान्सिस मॅनवेल आणि त्याचे सहकारी यांनी संगनमत करत हॉटेल व्यावसायिक अभय भन्साळी यांची खासगी मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार गेल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचा : गोंदिया : चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त, कारण काय? जाणून घ्या..

शहरातील सर्वसामान्य तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांमध्ये याआधी डेव्हिड गँगची दहशत होती. संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यासाठी जागा कुमक पाठवण्यात आली. पोलिसांनी इगतपुरी येथे छापा टाकत कऊ भाई, संतोष बजाज, पंकज बजाज (रा. इगतपुरी रेल्वे स्थानक) यांना ताब्यात घेत अटक केली. या तिघांच्या अटकेमुळे इगतपुरीतील गुन्हेगारी घटकांना हादरा बसल्याचे मानले जात आहे.