नाशिक : दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील केंद्रीय संरक्षण विभागाच्या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या तारांमध्ये शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वन विभागाने मुक्तता केली. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शिवनई गावालगत असणाऱ्या खंडेराव मंदिरानजीक हा प्रकार घडला. संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीत तारांचाही समावेश आहे.

हेही वाचा…अयोध्येतच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरात आहे श्रीरामाची कृष्णवर्णीय मूर्ती; मोदींनीही घेतले आहे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन जात असताना त्यामध्ये अडकला. परिसरातील शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. दिंडोरीचे विभागाचे वनपाल अशोक काळे व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तारेत अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यासाठी पथकाने त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुध्द पडल्यानंतर त्याची तारेतून सुटका करण्यात आली. हा बिबट्या तीन वर्षे वयाची मादी असल्याचे वन विभागाने म्हटले आहे. बिबट्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील निवारा केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती वन अधिकारी अधिकारी काळे यांनी दिली आहे.