नाशिक : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबारहून मुंबईकडे निघालेला सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा रविवारी नाशिक येथे येत आहे. मोर्चात १० हजाराहून अधिक आदिवासी, कष्टकरी बांधव असल्याने मोर्चा शहरातून जात असतांना वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने रविवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा निघाला आहे. हा मोर्चा ओझर ओलांडल्यावर दहावा मैल- आडगाव चौफुली- जत्रा हॉटेल चौफुली -रासबिहारी- अमृतधाम चौफुली- संतोष टी पॉईंट येथून उजवीकडे वळण घेत काट्या मारूती- निमाणी-पंचवटी कारंजा-रविवार कारंजा- मेहेर सिग्नल–सीबीएस सिग्नल-त्र्यंबक नाका सिग्नलमार्गे गोल्फ क्लब मैदानावर थांबणार आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ आदिवासी विकास भवनात निवेदन देण्यासाठी जाणार आहे. यानंतर मोर्चा मुंबई नाकामार्गे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होईल. या काळात या परिसरात होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नाशिक : गंगापूररोड परिसरात बिबट्या जेरबंद

या काळात होणारी गर्दी पाहता दहावा मैल ते आडगाव पर्यंत डावीकडील एक मार्गिका मोर्चासाठी असल्याने ती मार्गिका सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे. डी मार्ट ते हॉटेल जत्रा- रासहबिहारी- स्वामी नारायण चौक ते तपोवन क्रॉसिंग पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहणार आहे. तपोवनकडून आडगाव बाजूकडील सर्व्हिस रोड स्वामी नारायण चौक-अमृतधाम- रासबिहारी- जत्रा हॉटेल चौक ते डी मार्ट-आडगाव हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. संतोष टी पॉईंट ते मालेगाव स्टॅण्ड रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

हेही वाचा : “मुलगा देशाशी गद्दारी करणे अशक्य”, गौरव पाटीलच्या वडिलांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या टप्प्यात मोर्चा शहरात आल्यावर रविवार कारंजा -सांगली बँक सिग्नल-एम.जी रोड-मेहेर सिग्नल-सीबीएस सिग्नल- मोडक सिग्नल- तरण तलाव-चांडक सर्कल-मुंबई नाका-इंदिरा नगर बोगदापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोड इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक ते लेखानगर-राणेनगर- पाथर्डी फाटा-गरवारे, विल्होळी नाका या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील. हे सर्व मार्ग सकाळी आठ ते मोर्चा जाईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालक यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.