नाशिक : नागपूर अधिवेशनात आपल्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. चित्रफितीत बदल करण्यात आला असल्याचा दावा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी बडगुजर यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी विजया रहाटकर यांनी स्वतंत्र विदर्भची मागणी केली होती. त्या मागणीस विरोध करुन आम्ही ती सभा उधळली. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. तोपर्यत आपल्यावर साधा अदखलपात्र गुन्हाही दाखल नव्हता. राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल करण्यात आले. सलीम कुत्ता कैदी म्हणून कारागृहात होता. चित्रफितीत काहीतरी बनाव करण्यात आला आहे. सलीम कुत्ताशी आपला संबंध कधीही नव्हता, असे बडगुजर यांनी सांगितले.

हेही वाचा : सिन्नरमध्ये शिवशाहीखाली सापडून युवकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणात बुद्धिबळाचा खेळ सुरू राहतो, असे सूचक विधान करत अमली पदार्थासारख्या गंभीर आणि समाजाला उदध्वस्त करणाऱ्या आरोपींशी दादा भुसे यांचे काय संबंध आहेत, याची चर्चा होत आहे. या प्रकरणात पालकमंत्री भुसे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण काहीच केलेले नसल्याने भीती नाही. परंतु, भुसे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राजकारणात येण्यापूर्वी भुसे नोकरी करत होते. त्यांचे निलंबन का झाले, असा प्रश्न बडगुजर यांनी उपस्थित केला. आपली संपत्ती कायदेशीर असून काही बेकायदेशीर आढळले, सापडल्यास राजकीय संन्यास घेईन, असे त्यांनी नमूद केले.