नाशिक : आदिवासी शेतकरी, युवक आणि महिला यांच्यासाठी रोजगार, स्वयंरोजगारास चालना देण्याकरिता आदिवासी विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फतही आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

मंत्रालयात डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समूहांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षणाबाबत बैठक झाली. याप्रसंगी डॉ. गावित यांनी, मधुमक्षिका पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने देण्यात येईल, असे सांगितले. प्रत्येक गावातून या प्रशिक्षणासाठी १० लाभार्थींची निवड करण्यात येईल. मुक्त विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पाच दिवसांचे उद्योजकता आधारीत कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच प्रत्येक लाभार्थींना मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात येईल. मध आणि त्याच्या उपउत्पादनांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे.

हेही वाचा : जळगावात शेतकरी प्रश्‍नांसह ईडीविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध, जीवसत्त्वयुक्त पॉलिन्स आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी दोन आर्थिकदृष्ट्या महत्वाची उत्पादने आहेत. मध आणि त्याच्या उत्पादनांची मागणी यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यास नक्कीच मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुक्त विद्यापीठाचे डॉ. तुकाराम निकम यांच्या इस्त्रायलची सदाहरीत मधुक्रांती या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले.