लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : थंडीमुळे निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य देश-विदेशातील पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजला आहे. यामुळे अभयारण्याला जणूकाही पक्षी संमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दिवाळी संपली की जिल्ह्यात थंडी पसरण्यास सुरूवात होते. थंडीमुळे नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरूवात होते. यंदाही पक्ष्यांचे आगमन होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना हौशी पर्यटकांची अभयारण्याकडे पाऊले वळत आहे. यंदा वन विभागाकडून पक्षी गणना पूर्ण करण्यात आली. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, नांदुरमध्यमेश्वर गोदा नदीपात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव अशा सात ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले.

आणखी वाचा-साधुग्राम जागेवर नवीन प्रकल्पासाठी मनपाची तयारी, संकल्पना सुचविण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये पाणपक्षी गटात २१४६७, झाडांवरील आणि गवताळ भागातील पक्षी गटात २७०३ याप्रमाणे एकूण २४१७० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये थापट्या, गार्गनी, मार्श हरियर, वेडा राघु, तसेच स्थानिक पक्षी उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पुनबिल, रिव्हीर टर्न, कमळपक्षी शेकट्या आदी पक्षी आढळून आले आहेत.