नाशिक : महायुतीकडून नाशिक मध्य, निफाड आणि महाविकास आघाडीचा नाशिक पूर्व आणि देवळालीसह अन्य जागांवरील घोळ अद्यापही मिटलेला नाही. ज्या जागांवर आधी उमेदवार जाहीर झाले, तिथे बंडखोरीला उधाण आल्यामुळे कोणताही पक्ष बंडखोरांना नव्याने संधी देण्यास तयार नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावाचे रहस्य कायम राहिले.

महायुतीत सर्वप्रथम भाजपने जिल्ह्यातील चार मतदारसंघात आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यात विद्यमान आमदारांना संधी देताना नाशिक मध्यचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवला गेला. या मतदारसंघात सलग दोनवेळा निवडून आलेल्या देवयानी फरांदे यांच्यासह १० ते १२ जण इच्छुक आहेत. पहिल्या यादीत नाव न आल्याने फरांदेंसह अन्य काही इच्छुक मुंबईत तळ ठोकून होते. तरीदेखील अजूनही या जागेचा निर्णय झालेला नाही. या मतदारसंघावर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघाविषयी तशीच अनिश्चितता आहे. या जागेसाठी भाजप आग्रही आहे. भाजपचे यतीन कदम यांनी अजित पवार गटातून उमेदवारी द्यावी अथवा ही जागा भाजपला सोडावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मतदारसंघात सर्वेक्षण करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे निफाड मतदारसंघातही घोळात घोळचा प्रयोग सुरू आहे.

woman cheated grape growers, grape growers,
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
Dhule district fake death case to collect insurance money
विम्याचे पैसे मिळावेत म्हणून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

हेही वाचा…काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सांगली प्रारुपसाठी आग्रह, पक्ष निरीक्षकांकडून सबुरीचा सल्ला

u

महाविकास आघाडीत वेगळी स्थिती नाही. नाशिक मध्यच्या जागेत फेरबदल झाल्याने काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होऊन मैत्रीपूर्ण लढत अथवा अपक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने (उध्द ठाकरे) नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नांदगाव, निफाड आणि मालेगाव बाह्यच्या जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील सिन्नर वगळता एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसची वेगळी स्थिती नाही. या दोन्ही पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या असल्या तरी यात नाशिकमधील अनेक मतदारसंघांचा समावेश नाही. नाशिक पूर्व, देवळालीचा तिढा कायम आहे. नाशिक पूर्वची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने मागितली आहे. देवळाली मतदारसंघ गतवेळी एकसंघ राष्ट्रवादीने ताब्यात घेतला होता. त्यामुळे ही जागा शरद पवार गटाला मिळेल हे गृहीत धरले जाते. आधीच नावे जाहीर झाल्यास बंडखोरांना वेळ मिळतो. त्यामुळे अखेरच्या क्षणी नावे जाहीर करून बंडखोरांना शक्य तितके रोखण्याचे प्रमुख पक्षांचे निय”

हेही वाचा…जमिनी लाटण्याचा उद्योग कोणी केला, छगन भुजबळ यांचा सुहास कांदेंना प्रश्न

दिलीप दातीर यांचा मनसे राजीनामा

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेने दिनकर पाटील यांना तिकीट दिल्यामुळे या जागेसाठी इच्छुक दिलीप दातीर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गतवेळी मनसेकडून त्यांनी ही जागा लढविली होती. तेव्हा त्यांना २५ हजार ५०१ मते मिळाली होती. यावेळी ते पुन्हा इच्छुक होते. परंतु, पक्षाने वेगळा प्रयोग केल्यामुळे नाराज दातीरांनी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.

Story img Loader